0%

11th Admission Maharashtra 2025: 11 वी प्रवेशा बदल संपूर्ण माहिती

11th Admission Maharashtra 2025: 11 वी प्रवेशा बदल संपूर्ण माहिती: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग दहावीचा स्टेट बोर्ड व सीबीएससी चा निकाल लागलेला आहे. आणि आता तुम्हाला वर्ग अकरावी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. परंतु जुनी पद्धत जशी की कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करणे  हे बंद झाले आहेत.यावर्षी सर्व प्रवेश हे (Centralized Online Admission Process – CAP)  ऑनलाईनच होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 यावर्षी सर्व महाराष्ट्रातील सर्व कॉलेज साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यांना वर्ग अकरावी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे.त्या सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी ऑनलाईन अर्ज भरणे आहे.त्याची सविस्तर माहिती खाली आपल्या jobkhajana.com या वेबसाईटवर दिलेली आहे.

११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ वेळापत्रक

11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियासाठी फेज १ प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा आणि टप्पे

१. सराव सत्र (Practice Session): 19 मे ते 20 मे 2025 (सायंकाळी ६:०० पर्यंत)

विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरायला सराव मिळावा यासाठी हे सत्र ठेवण्यात आले आहे. या कालावधीत भरलेली माहिती केवळ सरावासाठी असेल आणि ती २० मेनंतर हटवली जाईल.

२. प्रथम नोंदणी व पसंतीक्रम भरणे: 21 मे ते 28 जून 2025 (सायं. ६:०० पर्यंत)

विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करून पसंतीक्रम (college preferences) भरणे आवश्यक आहे.

यामध्ये खास कोटा (व्यवसायिक, इजा.ह.आम., अल्पसंख्याक) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अर्ज उपलब्ध आहेत.

प्रत्येक फेसीसाठी “Consent” देणे अनिवार्य आहे.

३. तात्पुरती गुणवत्ता यादी: ३० मे २०२५ सकाळी ११:०० वाजता

पात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

४. हरकती व सुधारणांची संधी: ३० मे ते २ जून २०२५ (सायं. ४:०० पर्यंत)

जर यादीमध्ये काही त्रुटी आढळल्या, तर विद्यार्थ्यांना त्यात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.

५. अंतिम गुणवत्ता यादी: ३ जून २०२५ सायं. ४:०० वाजता

शेवटची आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

६. प्रवेश वाटप (फेज १): ५ जून २०२५

गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालये वाटप केली जातील. यामध्ये पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य आहे.

७. महाविद्यालयांची यादी: ६ जून २०२५ सकाळी १०:०० वाजता

विद्यार्थ्यांना कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, हे पोर्टलवर पाहता येईल.

८. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे: ६ ते १२ जून २०२५ (सकाळी १०:०० ते सायं. ६:०० पर्यंत)

या कालावधीत विद्यार्थ्यांनी:

“Proceed for Admission” निवडावे

आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी

प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा

९. दुसऱ्या फेसीसाठी रिक्त जागांची यादी: १४ जून २०२५ रात्री १०:०० वाजता

फेज १ नंतर जर काही जागा रिकाम्या राहिल्या, तर त्यांची यादी जाहीर होईल आणि पुढील फेसेससाठी प्रक्रिया सुरू होईल.

महत्त्वाच्या सूचना:

  • प्रवेशासाठी अधिकृत वेबसाइट वापरा आणि वेळोवेळी लॉगिन करून सर्व अपडेट्स तपासा.
  • “Consent” न दिल्यास पुढील फेसीमध्ये प्रवेश अर्ज करता येणार नाही.
  • प्रथम पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील फेसेससाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.
  • सर्व वेळा काळजीपूर्वक पाळा; कोणतीही संधी चुकवू नका.

निष्कर्ष:

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. वेळेत व योग्य माहितीच्या आधारे ही प्रक्रिया पार पाडल्यास विद्यार्थ्यांना त्यांची पसंतीची शाळा मिळू शकते. त्यामुळे वर दिलेले सर्व टप्पे आणि सूचना काळजीपूर्वक पाळा आणि यशस्वी प्रवेश मिळवा!

११ वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

  • दहावीचा मार्कशीट
  • दहावीची टी.सी
  • जात प्रमाणपत्र (जर लागूअसेल)
  • नॉन क्रिमिलीयार प्रमाणपत्र (जर लागूअसेल)
  • डोमेसाईल प्रमाणपत्र
  • अपंग प्रमाणपत्र (जर लागूअसेल
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्रे (उदा. राष्ट्रीय क्रीडा पात्रता प्रमाणपत्र, इ.)

अर्ज भरण्यासाठी :- येथे क्लिक करा

वेबसाईट व इतर माहित लवकरच उपलब्ध केल्या जाईल

Std. 11th Centralised Online Admission Process 2025 – 26, 11th Admission Maharashtra 2025, mahafyjcadmissions, FYJC

वेबसाईट व इतर माहित लवकरच उपलब्ध केल्या जाईल

Leave a Comment